Ad will apear here
Next
‘टाटा मोटर्स’तर्फे ‘टेकफेस्ट आणि स्किलफेस्ट’चे चौथे पर्व
११ हजारांहून अधिक डीलर, तंत्रज्ञ व सेवा सल्लागारांचा सहभाग

मुंबई : ‘टाटा मोटर्स’तर्फे ‘टाटा मोटर्स ग्लोबल टेकफेस्ट आणि स्किलफेस्ट २०१९’ या उपक्रमाचे चौथे पर्व नुकतेच आयोजित करण्यात आले होते. व्यावसायिक वाहनांच्या जगभरातील तंत्रज्ञांचे आणि सेवा सल्लागारांचे कौशल्य व ज्ञान यात सुधारणा करण्याच्या उद्दिष्टाने हा उपक्रम राबवला जातो. या कार्यक्रमासाठी जगभरातील २९ देशांतील सातहजार ४०० तंत्रज्ञ व साडेतीन हजार सेवा सल्लागारांनी प्रवेशिका भरल्या होत्या. यात भारतातील ८०१ चॅनल पार्टनर्स आणि आसियान, लाताम, सार्क, एलएचडी आफ्रिका, आरएचडी आफ्रिका व आखाती देशांतील (मिड्ल इस्ट) ५०० चॅनल पार्टनर्सचा समावेश होता.  

आपल्या व्यावसायिक वाहनांच्या चॅनल पार्टनर्समधील तंत्रज्ञ व सेवा सल्लागार आणि टाटा मोटर्स यांच्यात परस्पर समजूत वाढीला लावण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. सहभागी सदस्यांची तांत्रिक तसेच सल्लागार कौशल्ये साजरी करणे, त्यांना सेवेतील अत्याधुनिक तंत्रे शिकण्याची मुभा देणे, त्यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा समजून घेणे आणि सेवा व डिलिव्हरीचा दर्जा सर्वोच्च राहील याची खातरजमा करणे हा या वर्षीच्या पर्वाचा विषय होता. 

यातील ‘स्किलफेस्ट’च्या प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे दोन हजार डॉलर्स, दीड हजार डॉलर्स आणि एक हजार डॉलर्स अशी रोख बक्षिसे देण्यात आली. ‘टेकफेस्ट’साठी प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे सतराशे डॉलर्स, बाराशे डॉलर्स आणि सातशे डॉलर्स अशी रोख बक्षिसे देण्यात आली. 

या विषयी बोलताना ‘टाटा मोटर्स’च्या सीव्हीबीयूच्या ग्राहक सेवा विभागाचे जागतिक स्तरावरील प्रमुख आर. रामकृष्णन म्हणाले, ‘कुशल मनुष्यबळाचा, विशेषत: तंत्रज्ञांचा तुटवडा हे वाहन उद्योगापुढील मोठे आव्हान आहे. उद्योगाचे स्वरूप बदलत असताना, त्यातील सेवांमध्येही सुसंगत उत्क्रांती होत राहणे अत्यावश्यक आहे. उद्योगक्षेत्रातील कौशल्याची कमतरता भरून काढणे व सहभागी सदस्यांना प्रत्यक्ष अध्ययानाची संधी देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. एक जबाबदार कंपनी म्हणून आम्ही या उद्योगातील कौशल्यविकास व रोजगार निर्मितीच्या कामाप्रती बांधील आहोत.’

यात सहभागी सदस्यांना व्यावसायिक वाहनांच्या विविध अंगांचा परिचय करून दिला जातो. यासाठी तांत्रिक पद्धतींचे स्पर्धात्मक परीक्षण, उत्पादनाबद्दलची निदाने, समस्या निवारण कौशल्ये, साधन उपकरणांच्या वापराची माहिती, कामाच्या सुरक्षित पद्धती, प्रक्रियांची माहिती, सीआरएमडीएमएस व ग्राहक सेवा अॅप यांसारख्या सेवा आयटी परिसंस्था यांची माहिती करून दिली जाते. ग्राहककेंद्री दृष्टिकोन, सॉफ्ट स्किल्स तसेच तंत्रज्ञानातील नवीन घडामोडी यांची माहिती दिली जाते. 

ही पाच टप्प्यांची स्पर्धा विविध तांत्रिक व सैद्धांतिक (थिओरेटिकल) चाचण्यांवर आधारित आहे. याद्वारे तंत्रज्ञांच्या दर्जाचे विश्लेषण केले जाते. या मूल्यांकन प्रक्रियांच्या माध्यमातून टाटा मोटर्सला प्रगत प्रशिक्षण प्रारूपे विकसित करणे शक्य होते. या प्रारूपांच्या माध्यमातून विशेष साधनांसाठी तांत्रिक कौशल्ये अद्ययावत करणे तसेच त्यांच्या वापरात सुधारणा आणणे शक्य होते. त्याचप्रमाणे सर्वोत्तम प्रतिभा ओळखून त्यायोगे चॅनल पार्टनर्समध्ये निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण करता येते. या उपक्रमाची चार पर्व झाली असून, त्यातून कंपनीच्या व्यावसायिक वाहन चॅनल पार्टनर्समधील वीस हजारांहून अधिक तंत्रज्ञ व सेवा सल्लागारांना प्रशिक्षण, तसेच प्रत्यक्ष अनुभव प्राप्त झाला आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZIACB
Similar Posts
‘टाटा मोटर्स’तर्फे ‘फोटो ओके प्लीज’ स्पर्धा मुंबई : ‘टाटा मोटर्स’ कंपनीतर्फे ट्रक व्यवसायातील कलाकारांसाठी ‘फोटो ओके प्लीज’ ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या व्यवसायातील लोकांच्या आयुष्यातील आनंद शोधणे आणि चालकांना डिजिटल यंत्रणा वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे या हेतूने राबवण्यात येणारी ही स्पर्धा आता देशभर पोहोचली आहे. संपूर्ण देशातील
‘टाटा मोटर्स’तर्फे ‘विंगर १५ सीटर’ महाराष्ट्रात सादर मुंबई : टाटा मोटर्सतर्फे ‘विंगर १५ सीटर’ ही मोनोकॉक बस नुकतीच महाराष्ट्रात सादर करण्यात आली. प्रवाशांना सर्वोत्तम आराम मिळवून देतानाच वाहनचालकाला पैशांचे सर्वाधिक दीर्घकाळ मूल्य मिळवून देण्याच्या उद्देशाने या १५ आसनी वाहनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. १२.०५ लाख रुपये किंमतीला सुरू होणारी ‘विंगर १५एस’
‘तनिष्क’तर्फे ‘गुलनाझ’ दागिन्यांची श्रेणी सादर मुंबई : तनिष्क या भारतातील सर्वाधिक पसंतीच्या अलंकार ब्रॅंडने ‘गुलनाझ’ हे नवीन कलेक्शन सादर केले आहे. निसर्गाच्या औदार्याचे सौंदर्यपूर्ण प्रतिनिधित्व करणारी डिझाइन्स हे तनिष्कच्या या नवीन कलेक्शनचे वैशिष्ट्य आहे.
‘टाटा मोटर्स’चा ‘वाइस ट्रॅव्हल’शी पुण्यात सामंजस्य करार पुणे : टिगोर इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (ईव्ही) पुण्यात पुरवठा करण्यासाठी ‘टाटा मोटर्स’ने वाइस ट्रॅव्हल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (WTi) सोबत करार केला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language